पुणे विमानतळ येथील हॉटेल बॅकस्टेज मध्ये महिलेला मारहाण,पोटावर,हातावर केले वार.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे विमानतळ येथील हॉटेल बॅकस्टेज मध्ये महिलेच्या पोटावर,हातावर वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.याप्रकरणी एका २८ वर्षे महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने ६१०/२०२३, भादविक ३०७, ३२३,५०४,५०६ प्रमाणे अशोक लक्ष्मण आढाव, वय-३१ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, विमाननगर, याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अशोक आढाव याला पोलिसांनी अटक केली आहे. काल रात्री १ वाजता फिर्यादी हया ईस्ट कोर्ट बिल्डिंग येथील हॉटेल बँकस्टेज येथे गेले असताना, अशोक आढाव याने रात्री १ वाजता हॉटेल बॅकस्टेज मध्ये येवुन, त्यांचेवर संशय घेवुन, त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी हॉटेलचे स्टाफने त्यास तेथुन हाकलुन दिल्यानंतर फिर्यादी हया हॉटेल मधुन निघुन ईस्टकोर्ट बिल्डींगचे समोर येवुन थांबले असताना, सदर इसमाने सदर ठिकाणी येवून फिर्यादी यांना परत शिवीगाळ व हाताने मारहाण करून, तुला सोडत नाही,

खल्लासच करतो असे बोलुन, त्याचे जवळील धारदार हत्याराने फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने, त्यांचे पोटावर व डाव्या हाताचे दंडाच्या खालचे बाजुस वार करून, फिर्यादी यांना गंभीर जखमी करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपास सहा पोलिस निरिक्षक कादीर देशमुख करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here