कोरेगावपार्क येथील हॉटेल रोव्ह (प्लन्ज) वर कारवाई

0
Spread the love

पहाटे ५ पर्यंत चालू असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाची व उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पहाटे ५ वाजेपर्यंत कोरेगाव पार्क मध्ये हॉटेल, पब, चालू असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने व उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. हॉटेल, पब,बार चेक करीत असताना हॉटेल रोव्ह (प्लन्ज) हे रात्री उशिरापर्यंत चालु असल्याची माहिती मिळाल्यावरुन हॉटेल रोव्ह (प्लन्ज) या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क,

यांचे पथकाने संयुक्तपणे पाहणी केली असता हॉटेल रोव्ह (प्लन्ज) मधील CCTV फुटेज पाहुन चेक केले असता पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल चालु असल्याचे दिसुन आले. तसेच अनेक त्रुटी आढळुन आल्या.

त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क चे दुय्यम निरीक्षक विरेंद्रसिंह व चौधरी यांनी संयुक्त रिपोर्टसह पंचनामा करुन याबाबत कारवाई केली आहे.सदर पबवर पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे राज्य उत्पादन शुल्क मार्फत कारवाई करण्यात येत आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके,पोलीस अंमलदार अयज राणे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिदे, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here