नागरिकांनी पालिकेचा केला निषेध
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
कोंढवा येथील विकासकामांचा फज्जा उडाला असून रस्त्यावर पावसाचे पाणी व गटारीचे पाणी मिसळून वाहत असल्याने कोंढवा बाबतीत डिंगया मारणा-यांचे फक्त “डिंगयाच” राहिले आहे.
दिवसेंदिवस कोंढव्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोंढवा हा आता मुंबईची “तुंबई” झाली आहे. पुणे महानगर पालिकेचा ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना आता संताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे.
बेकायदेशीर इमारती उभ्या राहिल्याने ड्रेनेज लाईनवर तान येत असून जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याची अत्यंत गरज आहे.ड्रेनेज लाईन बदलले नाही तर येत्या काळात पुर स्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
आज झालेल्या पावसामुळे “कोंढवाकर” भयभीत झाले आहे. गटारीचे लाईन व पावसाळी लाईन एकत्रित केल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे.
नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समिर शफी पठाण यांनी पालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला असून पुणे महानगर पालिकेने लवकरच ड्रेनेज लाईन बदलून नागरिकांना त्रासापासून मुक्त करावे,अन्यथा पुणे महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असे समिर पठाण यांनी पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.