पुणे महानगर पालिका वर्तुळात उडाली खळबळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेतील उपायुक्त व त्यांच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रमाणापेक्षा जास्त रक्कम मिळाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
आज सकाळपासूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झाडाझडती सुरू होती. त्या झाडाझडतीत एक कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भास्कर लांडगे वय ४९ व त्यांची पत्नी शुभेच्छा विजय लांडगे वय ४३ यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय लांडगे हे पुणे महानगर पालिकेतील आकाश चिन्ह उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत.
विजय लांडगे यांनी त्यांच्या पत्नीचे नावे १ कोटी २ लाख ६० हजार इतकी अपसंपदा धारण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ अधिकारी गळाला लागल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.