१३ जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
कोंढव्यातील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ( गुन्हे) जगन्नाथ जानकर व इतरांवर गुन्हे दाखल झाल्याने पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
भारत बंद आहे तुझे मासे विक्रीचे दुकान बंद कर म्हणत माजी आमदाराने दादागीरी करत शिवीगाळ केल्याने दाद मागण्यासाठी पोलिस स्थानकात गेलेल्या बाळासाहेब म्हस्के या फिर्यादीला पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी हाताने मारहाण केली होती.
दरम्यान बाळासाहेब म्हस्के यांनी एॅड तौसीफ शेख यांच्या मार्फत न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती.न्यायालयाच्या आदेशानुसार माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी,
सईद शेख, राजू सय्यद, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर,सहायक पोलिस
निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे,गरुड, नदाफ, सुब्बानवाड,
सुरेखा बडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.