कोरेगाव पार्क परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन गाणे वाजवणारे डेझर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार याचेवर कारवाई;साऊंड सिस्टीम जप्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

११ मार्च रोजी सामाजिक सुरक्षा विभागातल पोलीस अधिकारी व पोलीस
अंमलदार हे लेन नं. ७ कोरेगाव पार्क, पुणे परीसरात पेट्रोलिंग करीत असताना डेझर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार मध्ये मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.त्यांनतर त्यांनी सदर ठिकाणी खात्री केली असता डेझॅर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार कोरेगाव पार्क,पुणे येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत सुरू असल्याचे आढळल्याने त्यांनी सदर हॉटेलवर कारवाई करून १ लाख १०हजार रूपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त केल आहे.


सदर हॉटेलचे मालक व मॅनेजर यांचे विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगांव पार्क पोलीस ठाणेच्या ताब्यात दिला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड तसेच अनिकेत पोटे,पोलीस अंमलदार,अजय राणे,जमदाडे व कोळगे यांच्या पथकाने केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here