पुणे स्टेशन परिसरातील घटना आली समोर.
खाजगी व्यक्तीला वाहनांना साखळी लावण्याचा अधिकार दिला कोणी?
पुणे सिटी टाईम्स (𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे शहर पोलिसांचा अजबच कारनामा समोर आला आहे. काही ना काही चर्चेने चर्चेत असलेले वाहतूक पोलिस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खाजगी व्यक्तींना ठेवून बरेच उद्योग करत असल्याचे पुणेकरांना दिसत असताना देखील वरिष्ठांना ते दिसत नसल्याचे चित्र आहेत. पोलिसांचा मनमानी कारभाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तीने दुचाकी लावल्याने त्या दुचाकीला एका खासगी इसमाने वाहतूक पोलिसांकडील साखळी लावल्याचे व्हिडिओत सुस्पष्ट दिसत आहे. त्या खाजगी इसमाने साखळी लावल्याने गोंधळ उडाला आणि तो खाजगी व्यक्ती इब्राहिम शेख यांनी साखळी लावायला सांगितले असल्याचे तो बोलत आहे. तर त्यावेळी वाहतूक पोलिस अंमलदार मोरे येउन तेही दुचाकी चालकावरच कुरघोडी करताना दिसत आहे.
तुम्ही त्या खाजगी व्यक्तीला साखळी लावण्याची परवानगी दिली आहे का? अशी विचारणा केल्यावर मोरे हे म्हणाले की नो पार्कींग मधील वाहनांना तो जॅमर लावतो? याला परवानगी तुम्ही दिली आहे का?असे प्रश्न नागरिकांनी विचारल्यावर मोरे यांची बोबडी वळाली व ते त्या खाजगी व्यक्तीला टोपीने व हाताने मारताना दिसत आहे.मोरे हे पुणे शहर वाहतूक पोलिस आहे का लोहमार्ग पोलिस या बाबतीत अधिक माहिती मिळाली नाही.
तो खाजगी व्यक्ती कोण? त्याला साखळी लावण्याची परवानगी दिली कोण? तर तो इब्राहिम शेख कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून याची चौकशी करून पोलिस अंमलदार मोरे यांच्यावर कारवाईची मागणी बघतोय रिक्षावाला या संघटनेने केली आहे.