पुणे शहरातील रूफटॉप हॉटेलांवर आता होणार कारवाई; १५ दिवसात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

0
Spread the love

रूफटॉप हॉटेल चालकांचे धाबे दणदणाले आहे.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

ईमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीर पणे बांधकाम व पत्र्याचे शेड उभारून मोठ्या प्रमाणावर रूफटॉप हॉटेल चालवले जात असल्याची बोंब होत असली तरी, प्रमुख्याने कारवाई होताना दिसत नव्हती. परंतु आता तक्रारी वाढल्याने व पुणे सिटी टाईम्सने वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्यने, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कारवाईचा फार्स आवडला आहे.

पुणे महानगर पालिकेने मधल्या काळात ९७ बेकायदेशीर रूफटॉप रेस्टॉरंट्सवर कारवाई केली होती, मात्र काही दिवसांनी ही रेस्टॉरंट पुन्हा सुरू झाले आहेत. या बेकायदा हॉटेल चालकांविरोधात पोलिस एफआयआर नोंदवणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.दरम्यान, पालिका मुख्याधिकाऱ्यांनी इमारत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी विभागातील सर्व कनिष्ठ अभियंत्यांना रूफ टॉप रेस्टॉरंट्स आणि साइड आणि फ्रंट मार्जिनमध्ये बांधलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार विभागाने कारवाई पुन्हा सुरू केली आहे.पीएमसी रूफ टॉप रेस्टॉरंटच्या विरोधात कारवाई करत आहे परंतु त्यांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली जात असल्याने पुणे महानगर पालिका जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवणार आहे. या पत्रात बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंटची नावे असतील आणि त्यांचा दारूचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाईल.

बार आणि रेस्टॉरंटना परवाने देण्यापूर्वी पीएमसीकडून एनओसी घ्यावी, अशी शिफारसही केली जाईल.काही मॉलच्या इमारती आणि टेरेसवर अनेक बेकायदा रेस्टॉरंट सुरू आहेत. रूफ टॉप रेस्टॉरंटची संकल्पनाच अस्तित्वात नसल्याने पीएमसीने एकाही रेस्टॉरंटला परवानगी दिलेली नाही.

कारवाईनंतर काही रेस्टॉरंटने काम सुरू केले असून काही रेस्टॉरंटच्या मालकांनी कोर्टात धाव घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर कोर्टात धाव घेतली असली तरी कोर्ट जो पर्यंत स्थगती देत नाही तोपर्यंत पुणे महानगर पालिकेने कारवाईचा हातोडा चालवावा अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे. तरी याचा पाठपुरावा पुणे सिटी टाईम्स पुढे देखील करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here