ट्राफिक चलन ऑनलाईन भरता मग तुमची होऊ शकते फसवणूक सावधान.. पुणे ट्राफिक विभागाने केले पुणेकरांना आव्हान.

0
Spread the love

फेक लिंक पासून सावधान.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

ऑनलाईन सोशल मीडियावर पुणे शहर ट्राफिक विभागाची चुकिची वेबसाइट प्रसारित होत असल्याने नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पुणे शहर ट्राफिक विभागाने प्रसिद्धपत्रक काढले आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांचे तर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघनासंदर्भात असलेले प्रलंबित चलन केसेसचा निपटारा करणे करीता पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा कार्यालय, येरवडा येथे ९ सप्टेंबर २०२३ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने वाहनचालकांचे मार्गदर्शन करणे करीता २८ ऑगस्ट२०२३ रोजीपासून पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा कार्यालयात “हेल्पडेस्क” सुरु करण्यात आले आहे.

या “हेल्पडेस्क” अंतर्गत नागरिकांना वाहतूक नियमांचे भंग केलेल्या चलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून या हेल्पडेस्क करीता वाहनचालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून वाहतूक नियमांचा भंग केल्याचे स्विकार करुन दंडाची तडजोड रक्कमेत तडजोड केली आहे.

वाहनचालकांना वाहनावरील प्रलंबित दंड रक्कम भरण्याकरीता https:// echallan.parivahan.gov.in/ या विहीत लिंकद्वारे ऑनलाईन पध्दतीने सुविधा उपलब्ध आहे. मात्र https://echallanparivahan.in/ याप्रमाणे अनधिकृत फेक लिंक प्रसारमाध्यमाद्वारे नागरिकांमध्ये वाहनावरील प्रलंबित दंड रक्कम भरण्याकरीता प्रसारित करण्यात येत आहे.

तरी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले वाहनावरील प्रलंबित चलन दंड रक्कम भरण्याकरीता https://echallan.parivahan.gov.in/ या शासकीय वेबसाईट व्यतिरिक्त कोणत्याही अवैध वेबसाईटचा वापर करु नये, केल्यास फसवणूक होईल. वाहनचालकांनी “हेल्पडेस्क ” करीता पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा कार्यालय, बंगला नं. ६, येरवडा पोस्ट ऑफिस शेजारी, पुणे येथे उपस्थित राहून प्रलंबित चलनाबाबत संपर्क साधण्याचे आव्हान मच्छिंद्र खाडे प्रशासन, वाहतूक शाखा, पुणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here