कोरेगाव पार्क येथील नदीत उडी मारणा-याचे जीव वाचवण्यासाठी अॅड वाजेद खान यांनी केली मदत

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

पुण्यातील सुप्रसिद्ध वकिल हे आज सकाळी रस्त्यावरून जात असताना कोरेगाव पार्क येथील नदीत बघता बघता एका इसमाने उडी घेतली, वाजेद खान यांना वाटलं की तो पोहत आहे.

परंतु जवळ जाऊन पाहिले असता तो इसम बुडत असल्याचे निदर्शनास आल्याने अॅड वाजेद खान यांनी त्याचे जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करून लोक जमा केले.

तर नागरिक येईस्तोवर खान यांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली, अग्निशमन दलाचे जवान येण्या आधीच त्या इसमाला काही लोकांनी नदीतून बाहेर काढून त्याचे जीव वाचवले आहे.

अॅड वाजेद खान म्हणाले मी एका महत्वाच्या केस साठी शिवाजीनगर न्यायालयात जात असताना सदरील प्रकार माझ्या निदर्शनास आला, माझ्या केस पेक्षा त्या इसमाचे जीव वाचविणे महत्वाचे असल्याने मी माझे प्रयत्न केले आणि त्याचे जीव नागरिकांनी वाचविल्यावर समाधान व्यक्त करत मी कोर्टाच्या दिशेने निघालो.अशी माहिती अॅड वाजेद खान यांनी पुणे सिटी टाईम्सला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here