पुणे सिटी टाईम्स (𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी.
पुण्यातील एडवोकेट वाजेद खान हे सारखेच सोशल मीडियावर चर्चेत असतातच,आता त्यांनी थेट न्यायाधीशांकडेच मागणी केल्याने लोक अचंबित झाले आहे.फॅमिली कोर्टात थेट व्हॅलनटाईन डे ( लव्ह-डे) साजरा करण्याची मागणी केली आहे.
१४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलनटाईन दिवस म्हणून साजरा केला जातो. नवरा बायको मधील जवळीक वाढावी, प्रेम वाढावे
एकोपा निर्माण व्हावा यासाठी फॅमिली कोर्टात व्हॅलनटाईन दिवसानिमीत्त एखादय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी लेखी मागणी मुख्य न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय यांच्याकडे करण्यात आली आहे.