बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास विमानतळ पोलिसांनी केली अटक,

0
Spread the love

पोलीस नाईक सचिन जाधव यांची कामगिरी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी, विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी पोलीस नाईक सचिन जाधव व प्रदिप मोटे यांना फॉरेस्ट पार्क, लोहगाव परीसरात मोकळ्या मैदानामध्ये एक इसम बसलेला असुन त्याचेकडे पिस्टल आहे. अशी माहिती मिळाली होती.

वरिष्ठांचे सुचनेनुसार कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी यांनी सापळा रचुन संतोष शंकर गुंजाळ वय २६ वर्ष रा. स.नं. १६५, दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर यास पकडले,

त्याचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळुन आल्याने त्याचे विरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलिस फौजदार अविनाश शेवाळे करीत आहेत.

सदरची कारवाई ही नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४, किशोर जाधव सहा पोलीस आयुक्त, येरवडा,यांचे आदेशान्वये भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे),

यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, सचिन जाधव, प्रदिप मोटे, रुपेश,पिसाळ, नाना कर्चे, गिरीष नाणेकर यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here