पुण्यातील सह.धर्मदाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल,

0
Spread the love

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,

पुण्यातील सहा.धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना १७ मे ते १ जून दरम्यान घडली आहे. सहा.धर्मादाय आयुक्त कार्यालयातील महिला अधिक्षकांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान सार्वजनिक न्यास नोंदणी तथा धर्मादाय सह.आयुक्त कार्यालय,पुणे विभाग,येथे अज्ञात इसमाने एकुण तीन व्यक्तीची धर्मादाय आरोग्य सेवक म्हणुन त्यांना नियुक्ती करण्याचे प्रलोभन दाखवुन,

सदर इसमाने महाराष्ट्र शासन विधी व न्यास विभाग सार्वजनिक न्यास नोंदणी तथा धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, पुणे विभाग,या कार्यालयाचे बनावट लेटर पॅड तयार करुन,

त्यावर बनावट सही करुन व ते पत्र नमुद तीन्ही व्यक्तींना देवुन कार्यालयाची व शासनाची फसवणुक केलेली आहे. कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात ४८/२०२२ भादविक ४२०,४६५, ४६८,४७१ कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here