कात्रज महिला तलाठयाची आजब देश की गजब कहानी? फकत ३ पंचनामे केल्याचे माहिती अधिकारात उघड

0
Spread the love

६ महिन्याला करतात फक्त एकच पंचनामा?

राजकीय पाठबळ असल्याने कारवाई होत नसल्याची हवेली तहसिल कार्यालयात चर्चा

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान

पुण्यातील कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक मध्ये अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, सदरील ठिकाणी बांधकामे करताना गौण खनिज उत्खनन करण्यापूर्वी शासनाला रॉयल्टी बहरली जाते. परंतु कोंढवा खुर्द येथे राजरोसपणे गौण खनिज उत्खनन करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असतानाही हवेली तहसिलदारांची अळीमिळी गुपचिळी दिसत आहे.

कात्रज तलाठी अर्चना वनवे फुंदे ह्या कोंढवा भागातील तलाठी असून त्यांनी आपल्या भागात कुठेकुठे गौण खनिज उत्खनन चालू आहे व त्याला परवानगी आहे किंवा नाही? हे तपासण्याचे काम वनवे यांचे असतानाही वनवे यांनी सन २०२० पासून फक्त ३ पंचनामे केल्याचे माहिती अधिका रात उघडकीस आले आहे.

अर्चना वनवे फुंदे ह्यांनी शासकीय कामात किती तत्परता दाखवली हे ह्या पंचनाम्यातून दिसून आले आहे. कोंढव्यात अनेक ठिकाणी गौण खनिज उत्खनन चालू असून त्याच्या तक्रारी करूनही तलाठी,मंडल अधिकारी आणि तहसिलदार यांच्याकडून शुन्य कारवाई होत असल्याने लाखोंचा महसूल बुडत आहे.याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वनवे फुंदे यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी कोंढवा खुर्द स नं ४६ येथील इनसिगनीया प्रॉप. प्रा.लि. यांनी ९६ ब्रास गौण खनिज उत्खनन केल्याचा पंचनामा सादर केल्यने इनसिगनीया प्रॉप. प्रा.लि.४२४९९२ रूपये दंड ठोठावला आहे.

तर स.नं ६५/६६ कोंढवा बुद्रुक येथील चोरडिया यांच्या जागेत गौण खनिज उत्खनन झाल्याने ६ महिन्यानंतर २९ जून २०२२ रोजी पंचनामा दिला असून,तीसरे पंचनाम्यात टेकडी फोड होऊनही उत्खनन वाहतूक केल्याचे दिसून येत नाही.असा पंचनामा २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सादर केला आहे.

पाह्यला गेलं की पंचनामे सहा सहा महिने होत नसल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे. कोंढव्यात अनेक ठिकाणी गौण खनिज उत्खनन चालू असताना फक्त तीनच पंचनामे? बाकींच्या सोबत साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न आज सर्व सामान्य माणसाला पडला आहे.

हवेली तहसिलदारांकडे तलाठी अर्चना वनवे यांचे बर्याच तक्रारी असताना आज तेही दुर्लक्ष करत आहेत. वनवे यांच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याने तहसिलदार कारवाई करण्यास कुचराई करत असल्याची चर्चा हवेली तहसिल कार्यालयात ऐकायला मिळत आहे. अधिक माहिती साठी हवेली तहसिलदार यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here