पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरातील सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता CP यांच्या आदेशाने काढले आहेत.
१) भरत शिवाजी जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस ठाणे ते विशेष शाखा ( स्पेशल ब्रांच) २) विलास तुळशिराम सोंडे (वरिष्ठ
पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस ठाणे ,३) सुनिल धोंडीराम जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा
४) राजेंद्र लांडगे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस ठाणे ते
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे,५) संगिता सुनिल जाधव,पोलीस निरीक्षक गुन्हे, खडकी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे ,
६) प्रकाश कृष्णराव पासलकर विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे सहकारनगर पोलीस ठाणे ७) शब्बीर सत्तार सय्यद पोलीस निरीक्षक गुन्हे फरासखाना पोलीस ठाणे यांची फरासखाना पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.
राजू थानसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक, विशेष शाखा यांची पोलीस निरीक्षक गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात नेमणुक करण्यात आली आहे.तसेच पोलीस निरक्षक चव्हाण यांच्या आदेशात बदल करण्यात आले आहे. त्यांची विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे सहकारनगर पोलीस स्टेशन ऐवजी वाहतूक शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.