पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
वाहतूक पोलिसांची अरेरावी व पिळवणूक नागरिकांना रोजच सहन करावे लागते, परंतु पुरावेच समोर आल्याशिवाय बरेच वाहतूक पोलीस आजही मस्तवाल झाले आहे.वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या एका सहायक फौजदाराने मद्यधुंद असताना वाहन चालकांना शिवीगाळ करुन दंडाच्या नावाखाली पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सहायक फौजदाराला निलंबित केल्याने वाहतूक पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रेमचंद भानुदास वेदपाठक असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.वेदपाठक शिवाजीनगर वाहतूक शाखेत सहायक फौजदार आहेत. मॉडेल कॉलनी परिसरात वाहतूक नियमन करत होते. कर्तव्यावर असताना वेदपाठक यांनी मद्यापान केले होते. त्यांनी वाहन चालकांना अडवडून दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती.
नागरिकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. यासंदर्भात एका महिलेने शिवाजीनगर वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार केली होती.महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी प्रेमचंद वेदपाठक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.