वसूलीवाला “थिटे” मालामाल तर जनता होत आहे कंगाल
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे शहरातील गजबजलेल्या ठिकाण म्हणजे विश्रामबाग पोलिस ठाणे, त्यांच्या हद्दीत सुरू होता अवैध जुगार अड्डा, मग काय सासुने ( समाजिक सुरक्षा विभाग) घातली धाड.
काल २९ जानेवारी २०२३ रोजी विश्रामबाग परीसरात एका बंद खोलीत बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार चालू असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर पत्त्याचा जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने पत्याचा जुगार खेळणारे १० इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम एकुण १ लाख २४ हजार ८७० घटनास्थळावरून जप्त केले.
सदर प्रकरणी पत्त्याचा जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व दोन पाहिजे अशा १२ इसमांविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुरनं. २७ / २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम ४ (अ) ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता विश्रामबाग पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त शहर,संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भरत जाधव तसेच अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, तुषार भिवरकर, संदिप कोळगे या पथकाने केली आहे.