येरवडा भागात अवैधरित्या चालणारा मटका जुगार अड्ड्यावर सासुचा छापा; १९ जणांवर कारवाई तर २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎 ) प्रतिनिधी

पुणे शहरातील येरवडा भागात सर्रासपणे अवैध धंदे चालू असतानाही स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने समाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून दुर्लक्ष करणा-या स्थानिक पोलिस ठाण्याच्या निदर्शनास आणून दिले आहे. काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची येरवडा पोलिस ठाण्यातून कंट्रोल रूमला बदली करण्यात आले होती. त्यात पुन्ह सासुची रेड पडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

येरवड्यात मटका जुगार चालू असताना समाजिक सुरक्षा विभागाने मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन १९ इसमावर कारवाई करून २२ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कारवाई काल दि.१ फेब्रुवारी रोजी येरवडा परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत असलेबाबत प्राप्त झाली.सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १८ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण २२ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा १९ इसमां विरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं.९५/ २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून,त्यांना पुढील कारवाई करीता येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार ,पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भरत जाधव तसेच सहा पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, आण्णा माने, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, संदिप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here