विना डिजे मिरवणूक काढणा-या मंडळांना कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते हाजी फिरोज शेख यांची ५१ हजार रुपयांची मदतीची घोषणा
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
येत्या ९ ऑक्टोबर रोजी मोहम्मद पैगंबर जयंती असून त्या जयंतीच्या दिवशी मिरवणूक काढल्या जातात, त्या मिरवणूकीत काही वर्षांपासून डिजेंचा ( DJ) सुळसुळाट वाढला आहे. डिजेमुळे नागरिकांना त्रास सोसावा लागतो. त्यासाठी पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्ते,
संघटनानी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त निघणा-या मिरवणुकीत नो डिजे ( NO DJ) ची हाक मारली असून त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आज पुण्यातील आझम कॅम्पस येथील अॅसबंली हॉल मध्ये मिंटीग आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे प्रतिनिधी,माजी नगरसेवक व मौलवी लोक उपस्थित होते. मिंटीगचया शेवटी पुण्यातील कोंढवा येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी फिरोज शेख यांनी सांगितले की जो मंडल विना डिजे मिरवणूकीत कोंढव्यातून सहभागी होईल त्यांना ५१ हजार रुपये दिले जाईल अशी घोषणा हाजी फिरोज शेख यांनी केली आहे.यावेळी नक्कीच बदल होईल असेही शेख यांनी सांगितले आहे.