आम्हाला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास दिला त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
एखाद्या वरिष्ठाची बदली झाली तर कनिष्ठ स्वखुशीने वरिष्ठांना गुलाबपुष्प देऊन व जेवण घालतात, परंतु पुण्यातील एका पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली झाल्याने थेट एका पोलिस कर्मचाऱ्याने आनंदच व्यक्त केला आहे.
तोही WhatsApp ग्रुपवर, त्यामुळे अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.एका ज्येष्ठ पोलिसाने बदली झालेल्या आपल्या साहेबाला दिलेल्या खोचक शुभेच्छांची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
पुण्यातील खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली झाली.त्यानंतर खडक पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हॉट्सअपवर (WhatsApp) पुणेकर स्टाईल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

तुम्ही तुपासह पाच पक्वान्न खात होते. परंतु, इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते! असे म्हणत या कर्मचाऱ्याने साहेबाला त्याची चूक दाखवून दिली आहे.या पोलीस कर्मचाऱ्याने व्हॉट्सअप मेसेजमध्ये लिहिले आहे की,साहेब मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतच नाही,
तुम्ही बदलून गेलात फार आनंद झाला, याचे पण उत्तर लगेच देतो. एक तर आपण कोणालाच रजा सुट्ट्या देत नव्हते.मी सरळ आणि प्रामाणिक काम करणारा साधा कर्मचारी होतो. पण आपली एकच भूमिका खडक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना अथवा अंमलदारांना तुमचा स्वभाव आवडला नाही.
तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते परंतु इतरांना फक्त कोरडा
भात खाऊ घालत होते.त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील.आम्हाला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास दिला त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल.कारण तुम्ही आम्हाला दिलेला त्रास आम्हाला झाला नसून, आमच्या बायका मुलांना झाला आहे.तरीपण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब.