पुणे येथे बेकायदेशीरपणे ५२ पत्त्यांचा रमी जुगार खेळताना क्लबवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; १२ जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

स्वारगेटच्या हद्दीत अवैध अवैध ५२ पत्यांचा खेळ चालला असतानाच सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. सोनिया गांधी नगर, झोपडपट्टी, कैलास भवन, नाल्याचे कडेला मोकळया पत्र्याचे शेडमध्ये, सार्वजनिक ठिकाणी स्वारगेट,येथे बेकायदेशीरपणे ५२ पत्त्यांचा पैशावर रमी हा जुगार खेळत असल्याची गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली.सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता बेकायदेशीरपणे ५२ पत्त्यांचा पैशावर रमी हा जुगार खेळत असल्याचे दिसल्याने १० इसम मिळुन आले.

त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम १५ हजार ४९० रूपये घटनास्थळावरून जप्त केली.सदर जुगार अड्डा कोण चालवत आहे याची माहिती घेतली असता सदर जुगार अड्डा हा दोन इसम चालवत असल्याची माहिती मिळाली. म्हणुन सदर प्रकरणी नमुद १० ताब्यातील व २ पाहिजे अरोपी असे एकुण १२ इसमांविरूध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुरनं १९४/२०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता स्वारगेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त,अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विजय कुंभार तसेच पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here