अनिल जाधव खूनप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलीसांनी घेतले ताब्यात,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, भररस्त्यावर अनिल जाधव याच्यावर सपासप वार करून खून करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ते पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला आहे. गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना,त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,मयत अनिल जाधव याचा खुन दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी केला असून ते चांदणी चौक, कोथरुड, या ठिकाणी येणार असल्याची बातमी समजली.

त्यानुसार सदर बातमीची पडताळणी करून वरिष्ठांच्या आदेशाने सापळा रचुन विधी संघर्षग्रस्त बालक चांदणी चौक,कोथरुड येथे आले असता, त्यांचेकडे चौकशी करून, त्यांचा गुन्हयात सहभाग आढल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

तसेच त्यांचेकडे अनिल जाधव याच्या खुनाबद्दल विचारणा केली असता सदर गुन्हयातील मयत अनिल जाधव दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालक यांना मावळे आळीतील त्याच्या घराजवळील रस्त्यातुन येता-जाताना शिवीगाळ मारहाण करत होता. तसेच विधी संघर्षग्रस्त बालकाकडुन सिगारेट व गाडीतील पेट्रोल भरण्यासाठी जबरदस्तीने पैसे घेत होता पैसे न दिल्यास मारहाण करत होता.

मागील दोन महिन्यापुर्वी अनिल जाधव याने त्याचे इतर साथीदारां सोबत मिळुन एका विधी संघर्षग्रस्त बालक यास मारहाण केली होती. या कारणास्तव अनिल जाधव यास दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांनी त्यांचे साथीदाराचे मदतीने कोयत्याने व तलवारीने मारहाण केल्याचे कबुल केले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुढील तपासकामी अलंकार पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त, डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त,रामनाथ पोकळे गुन्हे शाखा,पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे,सहा.पोलीस आयुक्त,‌ गुन्हे-१ गजानन टोम्पे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे -२, मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-१,गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरिक्षक संदिप बुवा, पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण, विजय कांबळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here