नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन.
” पुणे सिटी टाईम्स पाठपुरावा”
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
रिकव्हरीच्या नावाखाली नागरिकांना धमकी, शिवीगाळ, मारहाण अश्या घटना पुणे शहरात घडत असल्याने याबाबत पुणे सिटी टाईम्स ने बातम्या प्रसिद्ध करून आवाज उचलला होता.पुणे पोलिसांनी लोन रिकव्हरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांनी पोलिसांचे स्वागत केले आहे. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी लोन वर घेतलेल्या गाड्यांच्या संदर्भात सर्व सामान्य नागरिकांना रिकव्हरी एंजट कडून होत असलेल्या त्रासाचे अनुषंगाने गोपनीय माहिती काढुन कारवाई करण्याच्या सुचना खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा यांना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने मार्केटयार्ड परिसरामध्ये माहिती घेत असताना एका सर्व सामान्य नागरिकांची अडवणूक करुन आय.सी. आय.सी. आय बँकेचे रिकव्हरी एंजट असल्याचे सांगुन त्यांची वापरती बर्कमेन टू-व्हिलर मोपेड गाडी कर्जाचे हप्ते थकले आहेत या कारणास्तव स्वतःची कोणतेही ओळख न देता जबरदस्तीने काढुन निघुन जावुन सदरची दुचाकी गाडी परत करण्यासाठी ३७ हजार ५०० रुपये स्वतःचे अॅकाऊंट वरती खंडणी स्वरुपात घेवुन दुचाकी गाडी परत केली नाही अशी तक्रार प्राप्त झाली.
नमुद तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी नामे विनोद चंदर चव्हाण वय २३ वर्षे, रा. बिबवेवाडी कोंढवा रोड, गंगाधाम चौक, पुणे याला ताब्यात घेवुन अधिक माहिती घेतली असता आरोपी याने तक्रारदार यांची गाडी बेकायदेशीररित्या घेवुन पैसे स्वीकारुन, त्यांचे गाडीचा परस्पर अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३१/२०२४ भा.दं. वि. कलम ३४१,३८४,३९२,४१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आली आहे.
रिकव्हरी एंजट फायनन्स लोनचे नावाखाली बेकायदेशीररित्या कोणी गाडी घेवुन जात असल्यास सदर व्यक्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात येत असुन अशा घटना होत असल्यास त्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलीसांन मार्फत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शाना खाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, चेतन घावटे, अनिल कुसाळकर, चेतन चव्हाण, आजिनाथ येडे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, गणेश शिरोळकर महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे.