पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे शहरात वाहतूक पोलीसांची दादागिरी काही कमी होत नसल्याचे चित्र रोजच पाहयला मिळत असते, वाहतूक पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. त्यावर जालीम उपाय म्हणत वाहतूक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी नागरिकांची अडवणूक करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले होते.
काही दिवस रस्त्यावरून गायब झालेले वाहतूक पोलीस पुन्हा आता मिस्टर इंडिया सारखे समोर आले आहे. वाहतूक कोंडी संदर्भात पुण्याची अवस्था बिकट झाली असतानाही, आज वाहतूक कोंडी सोडवायचे सोडून भलतेच उद्योग करत असल्याचे पुणेकरांना दिसत आहे.
आज पुणेकरांवर चढण्याचा प्रकार वाहतूक पोलीस करत असल्याने पुणेकरांनी रोष व्यक्त केला आहे. असाच एक दादागिरीचा प्रकार काल वाहतूक पोलीसाने केल्याचा समोर आला आहे. येरवडा विमानतळ रस्त्यालगत वाहतूक पोलीस एका रिक्षाचालकावर मुजोरी करत असल्याचे त्या व्हिडिओतून दिसून येत आहे. तर रिक्षा थांबवून सदरील रिक्षातून महिला प्रवाशाला खाली उतरून जाण्याचे देखील सांगत आहे.
एखाद्या महिलेला अज्ञात स्थळी सोडून जाने म्हणजे महिलेच्या हक्कावर गदा आणणे? तर रिक्षा चालकाला वाहतूक पोलिसाने मोबाईल फोन फेकून मारल्याचे देखील व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.
वाहतूक पोलिसांची एवढी दादागिरी का वाढत आहे? याला कारणीभूत कोण? तो पोलिस कर्मचारी दारू पिऊन कामावर होता का? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहे. यावर पोलिस उपायुक्त रोहिदास पवार काय कारवाई करणार? याकडे लक्ष टिकून राहणार आहे.