केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आदेशाला पुणे महानगर पालिकेकडून केराची टोपली.
बेकायदेशीर बांधकामांना पुणे महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांचा अभय?
शेकडो अनधिकृत बांधकामे, मात्र कारवाई क्वचित?
इक्बाल विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
कोंढवा मध्ये कधीही काहीही होऊ शकते, यात प्रामुख्याने बेकायदेशीर बांधकामे. बेकायदेशीर बांधकामांचा पुर आला असतानाही पुणे महानगर पालिकेतील अधिकारी सुस्त बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. कोंढवा खुर्द मधील सर्वे नं ५२ हलीमा अपार्टमेंट शेजारी हाजरा डेव्हलपर इक्बाल बिल्डर याने गेल्या आठवड्यात जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बेकायदेशीरपणे बांधकाम चालू केले आहे.
बेकायदेशीर बांधकाम करताना तहसील कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केले. तर उत्खननाचे काम चालू असतानाच बांधकाम चालू करून फुटींग भरण्याचे काम चालू केले आहे.
फुटींग मजबूत नसतानाही, बेकायदेशीर बांधकाम करण्याची ऐवढी घाई का? घाई घाईत काम उरकण्याच्या नादात ते बांधकाम केलेली इमारत ढासळल्यास यात नागरिकांच्या जिवाची राखरांगोळी होईल यात शंकाच नाही.
मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे चालू असताना आणि नागरिकांचा जीव धोक्यात घातले जात असताना कोंढव्यात चाललंय नागरिकांच्या जिवाशी खेळ, पुणे महानगर पालिका बघण्यात व्यस्त आहे मांजर उंदराचा खेळ.! पालिका बघण्यात व्यस्त आहे मांजर उंदराचा खेळ?
पुणे महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच बेकायदेशीर बांधकामे फोफावली आहे. पुणे सिटी टाईम्सने वारंवार बेकायदेशीर बांधकाम थांबविण्यासाठी बातम्या प्रसिद्ध केल्या असल्यातरी पुणे महानगर पालिकेतील अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झालं आहेत.अधिकारी येतात तोंड बघून कारवाई करतात आणि निघून जातात. तर काही लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे की, मनपा कर्मचारी कारवाईसाठी येतात आणि फक्त आणि फक्त दोन तीन होल मारून निघून जातात.
अशा प्रकारांमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या धनाजी बिल्डरांना काहीच फरक पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कधी एखादी इमारत ढासळल्यास यात पुणे महानगर पालिकेतील अधिकारी, पोलिस, बांधकाम व्यावसायिक जबाबदार असणार. कोंढवा पोलिसांनी तात्काळ बेकायदेशीर बांधकाम थांबविण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना साखळे घालण्यात येणार आहे. क्रमशः