सदरील रेशनिंग दुकानदाराकडील प्रत्येक ग्राहकाचे जाबजबाब घेण्याची मागणी.
एका राजकीय कार्यकर्ताचा कार्यकर्ता असल्याने कारवाईस अधिकारी घाबरत आहे का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील भवानी पेठेतील रेशनिंग दुकानदाराचा मनमानी कारभार समोर आला आहे. तर ब” परिमंडळ कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आला आहे. रेशनिंग दुकानदाराबाबतीत रेशनिंग कार्यालयातील अधिका-यांना माहिती असतानादेखील सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
हकीकत अशी की भवानी पेठ काशेवाडी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्राहक संस्था या नावाने रेशनिंग दुकान असून मध्यंतरी त्या रेशनिंग दुकानावर कारवाई करण्यात आली होती. कारवाई करण्यात आल्याने सदरील दुकान ५३३ भवानी पेठ कल्पना कराळे या महिला रेशनिंग ( स्वस्त धान्य) दुकानदाराला दोन दुकाने जोडण्यात आली होती.

त्यात अट होती की ५३३ भवानी पेठ या ठिकाणी तुम्ही दुकान चालवत आहात त्याच ठिकाणी रेशनिंग दुकान चालवायचे आहे. इतर कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी चालविण्यात येऊ नये. परंतु दुकान जोडल्या पासून ते आजतागायत सदरील रेशनिंग दुकान कल्पना कराळे हयांच्याकडून “क्षाकशी” नावाच्या दुसऱ्याच महिलेला काशेवाडी मधील राजीव गांधी कॉम्पलेक्स मध्ये चालविण्यासाठी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तरी सुद्धा अन्न धान्य वितरण कार्यालयातील अधिका-यांचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. नियमबाह्य रेशनिंग दुकान दुसऱ्या ठिकाणी चालवली जात असताना अधिका-यांचे लक्षात कसे काय आले नाही? पुरवठा निरीक्षक म्हणून त्या भागात ” विजयकुमार क्षिरसागर ” असताना त्यांना सदरील बाब माहिती नव्हती का? पुरवठा निरीक्षक विजय क्षिरसागर यांचे आर्थिक हितसंबंधामुळेच गेल्या ३ वर्षापासून नियमबाह्य पत्यावर दुकान चालू आहे?
एखाद्या दुकानाचा पत्ता बदलायचा असेल तर अन्न धान्य वितरण अधिका-यांची ( FDO) परवानगी घेणे बंधनकारक असतानाही विना परवानगी दुकान चालू आहे. अधिक माहिती घेतली असता संबंधित दुकानदाराचे घरच्यांचे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या सोबत घनिष्ठ संबंध असल्याने व भवानी पेठेतील रेशनिंग दुकानदारांच्या संघटनेचा अध्यक्ष असल्याने अधिकारी कारवाईसाठी घाबरत असल्याने दुकानदाराचा मनमानी कारभार चालू असल्याने नागरिकां च्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. सदरील प्रकरणाबाबत अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांना संपर्क केला असता तो झाला नाही.
अधिक माहितीसाठी पुरवठा निरीक्षक विजयकुमार क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले रेशनिंग दुकान चालविण्याची परवानगी ५३३ भवानी पेठे येथे असून राजीव गांधी कॉम्पलेक्स मध्ये चालविण्याची परवानगी नाही. मी कामात निमित्ताने मंत्रालयात आलो आहे नंतर फोन करतो. मग परवानगी नाही तर कारवाई का होईना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रेशनिंग धान्य व दुकानदाराबाबतीत काही तक्रार असल्यास पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींशी संपर्क साधा ९८८१४३३८८३ क्रमशः