कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे बेकायदेशीर हुक्का?
शालेय विद्यार्थी हुक्का पित असताना वानवडी पोलिसांचे दुर्लक्ष का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरातील कोंढवा साळुंखे विहिर रोड ( कमेला रोड) येथील एका मॉलच्या टेरेसवर रात्री उशिरापर्यंत हुक्का पार्टी रंगत असल्याचे दिसून आले आहे. बेकायदेशीर हुक्का पार्टीवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हुक्का विक्रेत्याची गाडी सुसाट निघाली आहे.

साळुंखे विहार रोड,रिलायन्स फ्रेश मार्टच्या टेरेसवर “सुफिज हॉटेल ” मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी सुरू असताना देखील समाजिक सुरक्षा विभागाचे व वानवडी पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे.?
रात्री थोडपार उशीरा एखाद्यी लहान हॉटेल सुरू असेल तर त्यावर रुबाब झाडून, कारवाईचा बडगा उगारणारे पोलीसच दुर्लक्ष करीत असेल तर दाद कोणाकडे मागावी अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. यापूर्वीही “सुफिज हॉटेल ” वर कारवाई देखील करण्यात आल्या आहेत.
परंतु आजरोजी शुक्रवार, शनिवार, रविवार या तीनही दिवस धुमधडाक्यात हुक्का पार्टी चालू असतानाही पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर कारवाई करून कायमस्वरूपी सुफिज हॉटेल बंद पाडण्यात यावयावी अशी मागणीही लवकरच पुराव्या सहित पोलीस आयुक्तांकडे केली जाणार आहे.