पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या हॉटेल बंद करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितल्याने हॉटेल चालकाने आरडाओरडा करत राडा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डेक्कन पोलिसांनी सचिन हरीभाऊ भगरे वय ३३ , रा . कबीर बाग ,नारायण पेठ याला अटक केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद ( गु . रजि.नं ११६/२३ ) दिली आहे.हा प्रकार नदीपात्रात रविवारी मध्यरात्री दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये आहेत . शनिवारी रात्री ते रात्रपाळीच्या ड्युटीवर कार्यरत होते.विश्रामबाग पोलिस विभागात गस्त घालत असताना त्यांचे पथक नदीपात्रात आले. त्यावेळी मध्यरात्री दीड वाजता तेथील हॉटेल सदगुरू चालू असल्याचे दिसले . त्यांनी हॉटेल बंद करण्यास सांगितले .
तेव्हा सचिन भगरे याने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्याला घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यात आणले . तेथे सचिन भगरे याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना काय करायचे ते कर असे एकेरी भाषेत बोलून हात ढकलून दिला. व पोलीस अंमलदारांना ढकलू शासकीय कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.