पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील रविवार पेठेत एसबीआय बॅंकेचे एटीएम मशीनीतील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात ४२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्या अनुषंगाने फरासखाना पोलिस ठाण्यात भादविक ३८०,४२७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान फडके हौद रविवार पेठ येथे एटीएम असून यातील फिर्यादी हया एस. बी.आय.बँक , शंकरशेठ रोड , सेव्हन लव्हज चौक, या ठिकाणी डेप्युटी मॅनेजर या पदावर आहेत .
फिर्यादी हया डेस्क ऑफिसर म्हणुन काम करीत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने एटीम गॅस कटर व लोखंडी रॉडच्या सहाय्याने फोडून, एटीएम मशीनचे नुकसान करून, एटीएम मशिन मध्ये असलेली १३ लाख ३४ हजार २०० रुपये रोख रक्कम चोरी करून नेली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) अनिता हिवरकर करीत आहेत.