वाहतूक पोलीसांचा व पुणे महानगर पालिकेचा शुन्य नियोजन कारभार
पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर हे स्वत लक्ष केंद्रित करणार का?
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे शहरातील उपनगरातील कोंढवा मध्ये नियोजन शून्य ढिसाळ कारभार सुरू असल्याने वाहतूकीचे बाराच वाजले आहे. एकेकाळी कोंढवा हा वाहतूक कोंडी मुक्त कोंढवा ओळखला जायचा. परंतु आता कोंढवा मध्ये बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमण,अवैध रिक्षा वाहतूकमुळे होणारी रोजचीच वाहतूक कोंडी, यातून आता नागरिकांनी नको तो कोंढवा म्हणून दुसऱ्या ठिकाणी प्लॅन करण्याची वेळ आली आहे .
रिक्षा चालकांना शिस्त नसल्याने व त्यावर कोंढवा वाहतूक शाखेचे नियंत्रण नसल्याने कोंढवा वासियांना रोजचाच वाहतूकीच्या कोंडमा-यातून मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. विषेश म्हणजे अवजड वाहनांना बंदी असताना देखील सर्रासपणे अवजड वाहनांचा शिरकाव सुरूच असताना कोंढवा वाहतूक शाखेची यंत्रणा सपशेल फेल ठरली आहे.
कौसरबाग, कोंढवा गावठाण,मिठानगर बस स्टॉप, सत्यानंद हॉस्पिटल, मोर मॉल, शितल पेट्रोल पंप, पारगे नगर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वेडीवाकडी वाहने पार्क करून वाहतूकीस अडथळा निर्माण केला जात आहे. परंतु कोंढवा वाहतूक पोलिसांनी याकडे पाठ फिरवली आहे. मरू दे वाहतूक कोंडीत नागरिकांना अशी तर भावना नाही ना? असा प्रश्न आज पडला आहे.
उच्च शिक्षित लोकांच्या भागात दिसणारे वाहतूक पोलीस, मात्र स्लम भागात फिरत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी स्वत लक्ष घालण्याची आणि वाहतूक कोंडीतून जीव सोडविण्याची मागणी कोंढवाकरांनी केली आहे.