अन्न धान्य वितरण कार्यालयातील अधिका-यांच्या अंतर्गत कलह मुळे नागरिक टार्गेट?
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे शहरातील अन्न धान्य वितरण कार्यालय हे अत्यावश्यक सेवेत मोडणारे कार्यालय असून त्या कार्यालयाने सध्या परिमंडळ विभागांना रेशनिंग कार्ड वितरीत करणे बंद केल्याने गेल्या १ महिन्यापासून नागरिक वेट अॅन्ड वॉच मध्ये उभे राहिलेले आहे. आज अन्न धान्य वितरण कार्यालयात पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली असता सन २०१५ पासून परिमंडळ विभागाने वाटप केलेल्या रेशनिंग कार्ड व त्यातील रक्कमेचा हिशोब मागितल्याचे समजले. परंतु ज्या परिमंडळ विभागाने हिशोबच सादर केला किंवा हिशोब सादर केला आहे अश्या सर्व परिमंडळ विभागांना रेशनिंग कार्ड दिले गेले नसल्याने नागरिकांना त्यांचा फटका बसला आहे.
आरोग्यासाठी, विधवा महिलांसाठी, आरटीई साठी, फाटलेली दुबार मिळणेसाठी असे दररोज अर्ज परिमंडळ विभागात येत राहतात. परंतु केसरी कार्डच उपलब्ध नसल्याने नागरिकांची कुचंबणा झाली आहे. तर अन्न धान्य वितरण कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो पर्यंत रेशनिंग कार्डचा हिशोब नाही तोपर्यंत परिमंडळ विभागांना रेशनिंग कार्ड द्याचे नाही असा पवित्रा घेतल्याने परिमंडळ अधिकारी बुचकळ्यात सापडले आहेत.
ज्या परिमंडळ विभागांनी हिशोब सादर केला नाही त्यांच्यावर कारवाई करायची सोडून नागरिकांची अडवणूक करून काय साध्य करणार आहेत? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना अडचणीत टाकून ऐसीत बसून वारा खाणा-या अधिका-यांना गरिबांची काय जाणीव राहणार असे देखील पुणेकर म्हणत आहेत. तर त्वरित परिमंडळ विभागांना रेशनिंग कार्ड देण्यात यावे अन्यथा आंदोलन केले जाईल असे देखील काही नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.




