कोंढवा खुर्द मिठा नगर येथील भाजी मंडई चौकात सर्वात जुना पिंपळाचा झाड अचानक पणे कोसळला; सदर ठिकाणी वाहतूक कोंडी समीर पठाण यांनी सोडवली

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

कोंढवा मिठानर येथील सर्वात जुने झाड कोसळल्याने सदर ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती,या बाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी समीर शफी पठान यांना दिली, समीर शफी पठान यांनी तातडीने अग्निशामक दल कोंढवा वाहतूक विभाग, त्याच प्रमाणे पुणे महानगर पालिका उद्यान विभाग, यांच्याशी संपर्क साधुन जागेवरची परिस्थिती नियंत्रात आणली. सुदैवाने सदर ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

त्यावेळेस शासकीय यंत्रणाला मदत करण्यास मुजाहिद खान,अनवर खान, शादाब शेख , रियाज बागवान, अझहर (बावा) इम्रान जमादार,समीर शेख ,अमिर शेख , आदी कार्यकर्ते उपस्थित होते,कोंढवा खुर्द भागात अत्यावश्यक तातडीची अडचण र्निमाण होते ,त्यावेळेस सदैव नागरिकांच्या मदतीसाठी समीर शफी पठाण उपलब्ध असतात,अशी चर्चा सर्वकडे रंगली आहे.

त्यावेळेस बोलताना समीर शफी पठाण म्हणाले कोंढव्या भागातले,अडी अडचणी सोडविण्यासाठी आम्ही नागरिक अधिक मंच व भारतीय जनता पार्टी, नेहमी प्रयत्नशील असेल असे समिर शफी पठाण पुणे सिटी टाईम्सला म्हणाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here