पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे शहरातील शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. निखिल बाळासाहेब मालुसरे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, निखिल मालुसरे यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला.
कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला खाली उतरून केईएम रुग्णालयात दाखल केले.
परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची खडक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.
शिवसेनेचे शहर उपप्रमुख असलेले बाळासाहेब मालुसरे यांनी कोरोनाच्या काळात अनेक सामाजिक कार्य केले आहे.
त्यांच्या मुलाने अशा प्रकारे आत्महत्या केली त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान निखिलच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.