अवैध गौण खनिज केल्याप्रकरणी फक्त नोटिस पुढील कार्यवाहीकडे दुर्लक्ष का.( Pune kondwa royalty news)
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुण्यातील कोंढवा खुर्द सर्वे ५१/२ब/२३ चेतना पॅलेस याठिकाणी ५ मजली इमारत पुणे महानगर पालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पणे उभी तर राहिली, मात्र हवेली तहसिल कार्यालयाने अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी फक्त नोटिस बजावण्याचे काम केल्याचे समोर आले आहे.
हकीकत अशी की सदरील ठिकाणी इमारत बांधकामासाठी गौण खनिजाचे ( जमिन खोदण्याचे ) काम सुरू होते. त्यावेळी तक्रार दाखल झाली असता १७ ऑगस्ट २०२० रोजी हवेली तलाठी कोंढवा खुर्द हे सदरील ठिकाणी पंचनाम्यासाठी हजर झाले,
त्या वेळी २१० ब्रास माती,मुरुम अवैध गौण खनिज केल्याचा अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने तत्कालीन तहसिलदार सुनिल कोळी (हवेली) यांनी २७ ऑगस्ट २०२० रोजी फिरोज समद खान व सुलताना अहमद खान रा.कोंढवा खुर्द पुणे यांना नोटीस काढून १४ सप्टेंबर २०२० रोजी खुलासा करण्याचे नोटीसात नमूद होते.
परंतु फिरोज समद खान व सुलताना अहमद खान यांनी खुलासा केला नसल्याचे हवेली तहसिल कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्या बद्दल आणखीन माहिती घेतली असता धक्कादायक कागदपत्रे माहिती हाती आली की १५ महिन्यांचा कालावधी उलटला तरी सदरील अवैध गौण खनिज बाबतीत अंतिम आदेश झालेला नाही असे माहिती अधिकारात कळविण्यात आले आहे.
अंतिम निर्णयासाठी १५ महिन्यांचा कालावधी का लागला? लाखोंचा महसूल बुडत असताना दुर्लक्ष का?तहसिलदार कार्यालयाला महसूल नको आहे का? का यात कुठेतरी साटेलोटे तर झाले नाही ना? आताच्या तहसिलदारांना याची माहिती आहे का?
का त्यांना सदरील प्रकरणाची माहिती कळविली जात नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सदरील प्रकरणात सध्या कार्यरत असलेले तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील लक्ष घालणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
.........खान हे कोण?...........