पुणे सिटी टाईम्स बातमीचा परिणाम.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी. पुणे गंजपेठ, लोहियानगर येथील पोलीस चौकी समोरच मोठ्ठा खड्डा पडला असतानाही पोलीस चौकीतील व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे.
सदरील खड्डा वळणावरच असल्याने नागरिकांना अंदाज येण्याअगोदरच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.
त्या बातमीची दखल घेऊन काही तासांतच सदरील खड्डा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून बुजविण्यात आला आहे.
सदरील खड्डयाची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सचे आभार मानले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.