पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांच्यासहित इतरांची फसवणूक करणारे बंटी बबलीची धरपकड बिबवेवाडी पोलिसांनी केली आहे. पर्वती मतदार संघाचे आमदार माधुरी सतिष मिसाळ यांनाफोन करुन मुकेश राठोड असे नाव सांगुन, त्याची आई बाणेर येथील हॉस्पीटल मध्ये अॅडमिट असुन तिचे औषोधोपचारासाठी पैशाची गरज आहे.
असे सांगुन औषोधोपचारा करीता ३ हजार ४०० रुपये गुगल-पे नंबर देवुन त्यावर पाठविण्यास सांगितले त्या एक सामाजिक कार्यकर्त्या व आमदार असल्याने त्यांनी मदतीचे भावनेतुन आरोपीने दिलेल्या गुगुल-पे नंबर वर १२ जुलै रोजी सदरील नंबर रुपये पाठविण्यास त्यांच्या मुलीस सांगितल्याने होते. त्यांनी सदरची रक्कम गरजवंतास पाठविली.
माधुरी मिसाळ ह्या मुंबई येथे कामा निमित्त गेल्या असता त्यांचे सहकारी आमदार देवयानी सुहास फरांदे, मेघनाताई साकोरे बोरर्डीकर व श्वेताताई महाले यांना सुध्दा आरोपी मुकेश राठोड याने फोन करुन अशाच प्रकारचे कारण सांगुन पैशाची मागणी करुन त्यांची सुध्दा फसवणुक केली असल्याचे समजल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाणे पुणे येथे तक्रारी अर्ज दिल्याने सदर अर्जावरुन बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करुन फोन करणारा मुकेश अशोक राठोड रा. वसंत नगर, किनगाव जट्टू ता. लोणार, बुलढाणा २) गुगल – पे नंबर चा धारक सुनिता कल्याण क्षिरसागर रा. गल्ली नं.११ प्लॉट नं.२६३१, जयभवानी नगर, औरंगाबाद असे असल्याचे समजल्याने लागलीच आरोपींचा शोध घेणेकामी २ टिम तयार करुन एक टिम बुलढाणा व एक टिम औरंगाबाद येथे रवाना करण्यात आली होती.
आरोपींचा शोध घेवुन ताब्यात घेतले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास विलास सोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.सदरची कामगिरी नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५,
पौर्णिमा तावरे, सहा.पोलीस आयुक्त,वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शना खाली अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक,गुन्हे, प्रविण काळुखे, सहा. पोलीस निरीक्षक,विवेक सिसाळ, पोलीस उप निरीक्षक,पोलीस अमंलदार संतोष पाटील,गणेश दुधाने, शामराव लोहमकर, संतोष जाधव, सतिष मोरे, अतुल महांगडे, तानाजी सागर, शिवाजी येवले,राहुल शेलार, अभिषेक धुमाळ, महिला पोलीस अंमलदार पंचशिला गायकवाड यांनी केलेली आहे.