पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने बस चालक बडतर्फ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

आजकाल पीएमपीचे बस चालक कशीही बस दाटना दिसत असते, तर त्यावरून नागरिकांचे व बस चालकाचे हुज्जत होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेतच. परंतु आपण सरकारी वाहन चालवतोय याचा अर्थ आपलं कोणीच काही करू शकत नाही. परंतु जेव्हा सजग नागरिक जागा होतो त्यावेळी बस चालकाला घरी बसण्याची वेळ येते यात शंकाच नाही. असा एक प्रकार पुणे शहरात घडला आहे.


पीएमपीच्या ई-बस चालकाने रविवारी काल रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भैरोबा नाला चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीवरील एका महिलेला धडक दिली होती. यात ही महिला किरकोळ जखमी झाली असून, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर अवघ्या
तासाभरात पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी चालकाचे बडतर्फीचे आदेश दिले आहे.

भेकराईनगर-वारजे माळवाडी- एनडीए गेट एमएच १२ टी व्ही ०६९३ ही गाडी हडपसरवरून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघाली होती.बसचा वेग यावेळी क्षमतेपेक्षा जास्त होता.भैरोबा नाला चौकात बस आली असता सिग्नलवर उभ्या असलेल्या एका महिलेला बसने मागून धडक दिली.

या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली असून, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी चालकाला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.या प्रकरणाची माहिती पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना देण्यात आली.ओमप्रकाश बकोरिया यांनी बेशिस्त चालक रोहित तानाजी गवळी बॅच क्र.२५५ याला तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश दिले.गवळी हा ठेकेदाराचा चालक होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here