कोंढव्यात अनधिकृतपणे गौण खनिज सुरू असताना तलाठ्यांवर कारवाई शुन्यच?
निलंबित तहसिलदार तृप्ती कोलते यांना थेट बडतर्फ करण्याची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
पुणे हवेली तहसिलदार तृप्ती उमेश कोलते यांना निलंबित करण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तर कोलते यांच्या निलंबना नंतर त्यांच्या कामकाजावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर थेट बडतर्फ करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे. कोंढव्यात चालू असलेल्या अवैध गौण खनिज संदर्भात कात्रज तलाठी अर्चना वनवे फुंदे यांनी अवैध गौण खनिज करणा-यांना पाठिशी घालत असल्याचे पुणे सिटी टाईम्सने निलंबित तहसिलदार तृप्ती कोलते यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
परंतु कोलते यांनी फक्त आणि फक्त वनवे यांना खुलासा मागण्या शिवाय पुढे काहीच केलेले नाही. तर अनेक मोठ मोठे गौण खनिज संदर्भात कोलते यांनी दुर्लक्ष केले आहे.ईटीएस मोजनी संदर्भात पत्रव्यवहार झाला असताना कोलते यांनी फक्त कागदी घोडे नाचविल्याचे समोर आले आहे. कोंढव्यातील अनधिकृत गौण खनिजावर वेळेवरच कारवाई करण्यात आली असती तर आज कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीत पडले असते, परंतु कोलते व तलाठी अर्चना वनवे फुंदे यांना ते नको होते.
वनवे फुंदे यांच्या विरोधात जास्त तक्रारी झाल्याने निलंबित कोलते यांनी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी सकाळी जाऊन कोंढव्यातील गौण खनिजाची पाहणी केली होती. परंतु ती पाहणी फक्त पाहणीच राहिली, पुढे काही कारवाईच झालेली नाही. तर कोलते यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की आता तेथे बांधकाम झालेले असून त्या ठिकाणी आता काहीच करता येत नाही तर नवीन तक्रारी कडे बघू? याचाच अर्थ कोलते व वनवे यांचे लागेबांधे असतील?
कोलते यांनी निकाली काढलेल्या सर्व गौण खनिज फाईल्सची चौकशी करण्याची मागणी देखील होत आहे. तर कोट्यवधी रुपयांचा शासन महसूल बुडविणा-या अर्चना वनवे फुंदे यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी लोकायुक्त मुंबई व पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे जिल्हाधिका-यांना समक्ष भेटून केली जाणार आहे. क्रमशः ( पुढील बातमीत वाळू विक्रेत्यांवरील कारवाई)
” तृप्ती कोलते यांच्या कार्यकाळात तलाठ्यांच्या लाच बाबतीत आलेल्या तक्रारींवर वर्षाभर कारवाईच नाही? “
कात्रज तलाठी अर्चना वनवे फुंदे यांनी अपंग व्यक्तीला लाच मागितल्याची तक्रार एका संघटने २०२१ रोजी केली होती. त्या संघटनेच्या पाठपुरा व्यानंतर २०२२ म्हणजे १ वर्षांनंतर वनवे यांना खुलासा मागण्यात आला असला तरी अर्चना वनवे फुंदे यांच्यावर लाच मागितल्याची तक्रारीवरून तृप्ती कोलते यांनी कोणतीच कारवाई केली नाही.