नामांकित कंपन्यांचे बनावट टी शर्ट,जॅकेट,ट्रॅक पँट विक्री करणाऱ्या ५ जणांविरोधात लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

फॅशन स्ट्रीटमध्ये विविध नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट कपड्यांची चोरुन विक्री

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरात नामांकित ब्रॅण्डच्या नावाने बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्या ५ जणांविरोधात कॉपीराईटच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही करावाई लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने कारवाई करुन ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये नामांकित कंपन्यांचे बनावट टी शर्ट, जॅकेट,ट्रॅक पँट इत्यादी कपड्यांचा समावेश आहे.१) निसार उद्दीन समशुद्दीन शेख वय-३१ रा. कोंढवा खुर्द, २) रिझवान इरशाद कुरेशी वय-३२ रा. भिमपुरा, पुणे, ३) नोमान नझीर शेख वय-२९ रा.कुंबारवाडा, पुणे, ४) सय्यद राफे मकबुल अखतर वय-३२ रा. भवानी पेठ,पुणे, ५) मुस्ताक हसनसाब कुरेशी वय-३० रा. घोरपडी गाव, पुणे यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

याबाबत एरएनए टेक्नॉलॉजीचे अधिकारी महेंद्र सोहनसिंग वय-३६ रा.पोस्ट पेरवा,ता. बाली.राजस्थान यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटमध्ये विविध नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट कपड्यांची चोरुन विक्री होत होती.याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने फॅशन स्ट्रीटमधील विक्रेत्यांच्या गाळ्यांवर एकाच वेळी छापा टाकला.पथकाने पाच विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २२२ टी शर्ट, १०२जॅकेट्स, १३४ ट्रॅक पँट असा २ लाख ८० हजार रुपयांचे नामांकित कंपन्याचे बनावट कपडे जप्त केले.ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते,पोलीस अंमलदार गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, नागनाथ राख, मोहसीन शेख यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here