मुळशी भागात गांजाची शेती उध्वस्त,अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई.

0
Spread the love

११ लाख ६३ हजार १०० रूपये किंमतीचा एकुण १७३ किलो ९७५ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ जप्त.

पुणे सिटी टाईम्स 24 ; प्रतिनिधी. मुळशी भागात थेट गांजाची शेती मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत लाखों रुपयांचा माल जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर
पोलीस उपनिरीक्षक दिंगबर चव्हाण हे कोथरुड पोलीस ठाण्याच्या कायक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना १) चेतन मारुती मोहोळ ,वय २७ रा, कानीफनाथ सोसायटी,फ्लॅट नं १४, न्युडीपी रोड,कोथरुड २) साहेबा हुलगाप्पा म्हेत्रे,वय २० रा.गादीया इस्टेट महाराजा कॉम्पलेक्स मागे,पौड रोड,कोथरुड पुणे हे संशियतरित्या मिळुन आल्याने त्यांची झडती घेतली असता,त्यांचेकडुन ५८० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व एक दुचाकी असा एकुण ५१ हजार ६०० रूपयांचा ऐवज व अंमली पदार्थ जप्त करुन त्यांचे विरुध्द कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे आदेशाने पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,अंमली पदार्थ विरोधी पथक-१ यांचेकडे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड यांनी आरोपींकडे अटक मुदतीत त्यांनी गुन्हयात जप्त करण्यात आलेला ५८० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ कोठुन व
कोणाकडुन आणला याबाबत तपास करीत असताना, चेतन मारुती मोहोळ याने सांगितले की,त्याने सदरचा गांजा हा गवळीवाडा अंबरवेट ,पौड ता मुळशी पुणे येथुन अणला असल्याचे
सांगितले. सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व अंमली पदार्थ विरोधी पथक १
व पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर हे स्टाफसह जावुन, नायब तहसिलदार यांचे उपस्थितीत सदर ठिकाणाची झडती घेतली असता सदर ठिकाणी कि रु ३ लाख ,८० हजाराचा १८ किलो ९९५ ग्रॅम ओलसर हिरवट काळसर तपकिरे बोंड असलेला पाने व फांदया असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. तसेच सदर घरात घरमालक प्रकाश वाघोजी खेडेकर वय ३५ वर्षे व इंदुबाई बाबुजी खेडेकर वय ६५ वर्षे दोघे मिळुन आले त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी व तपास करता त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिल्याने नमुद आरोपींना तात्काळ दाखल गुन्हयाचे अनुषंगाने ताब्यात घेवुन त्यांचे रहाते घरात मिळुन आलेला १८ किलो ९९५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ त्यांनी कोठुन आणला याबाबत तपास करता त्यांनी त्यांचे रहाते घराचे जवळ असणारे जागेत गांजाची लागवड केली असुन त्या ठिकाणाहुन माल तयार केल्याचे सांगितले,सदर ठिकाणी जावुन पाहता त्या ठिकाणी एकुण २५० गांजाची तयार झाडे त्याची उंची अंदाजे ३ ते १२ फुट त्याचे वजन १५४ किलो ४०० ग्रॅम असे एकुण ७ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा अंमली पदार्थ मिळुन आलेने तो सविस्तर पंचनाम्याने यांनी जप्त करण्यात आला आहे.अशा प्रकारे कोथरुड पोलीस ठाण्यात गुरनं.२२८/२०२१ या गुन्हयाचे तपासात अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व २ यांचेकडुन संयुक्तीकरित्या कारवाई करुन एकुण ११ लाख ६३ हजार १०० रूपये किंमतीचा एकुण १७३ किलो ९७५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करुन १)चेतन मारुती मोहोळ, वय-२७,रा. कानीफनाथ सोसायटी,फ्लॅट नं.१४, न्युडीपी रोड,कोथरुड पुणे २)साहेबा हुलगाप्पा म्हेत्रे, वय-२०, रा. गादीया इस्टेट, महाराजा कॉम्पलेक्स मागे घर ८७ पौड रोड,कोथरुड पुणे ३)प्रकाश वाघोजी खेडेकर,वय ३५ वर्षे ४)इंदुबाई वाघोजी खेडेकर,वय-६५ वर्षे दोघेही रा गवळीवाडा अंबरवेट पौड ता मुळश पुणे असे एकुण ४ आरोपींच्या
मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.दाखल गुन्हयाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड हे करीत आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त, डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,गुन्हे शाखा,पुणे,पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा,सहा. पोलीसआयुक्त गुन्हे-२,लक्ष्मण बोराटे यांचे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व २,गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सहा. पो. निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पो.उप.निरीक्षक,दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार,सुजित वाडेकर, संदिप जाधव, मनोज साळुके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, विशाल शिंदे, नितेश जाधव, योगेश मोहिते, रेहना
शेख, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आजिम शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संतोष जाचक, महेश साळुके, दिशा खेवलकर यांनी केली आहे.