कोंढव्यातील राजकीय वातावरण पेटायला लागले? भावी विरूद्ध झाले माजी?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली खाली आज २० ऑक्टोबर रोजी मिठानगरच्या रहिवाशांकडून ड्रेनेज समस्याबाबत निषेध आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर गटारीचे पाणी वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दिवेंदिवस कोंढवा भागा मध्ये ड्रेनेजचे घान पाण्याचे साम्राज्य उभे झाले आहे. १५ ते २० वर्षा पूर्वीचे जुने ड्रेनेज पाईप लाईन असून लोकसंख्या जास्त झाल्याने ड्रेनेजचे घान पानी ओवर फ्लो होऊन नागरिकांच्या घरी शिरत आहे.
त्यामुळे नागरिक हैरान झाले आहेत.योग्य वेळेतच जर पाईप लाईन बदलून नविन पाईप लाईन टाकली असती तर कदाचित आज कोंढवा भाग गटर मुक्त झाला असता, अशी चर्चा सर्व रहिवाशांकडून होत आहे.
ताबड़तोप नविन ड्रेनज लाईनचे काम चालू करून कोंढवा मिठानगर गटर मुक्त करावा म्हणून नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण यानी कोंढवा वानवडी क्षेत्रीय कार्यालयचे सहाय्यक आयुक्त शाम तारु यांच्याकड़े मागणी केली आहे.
माजींकडून कोणत्याही प्रकारची कामे होत नसल्याने कोंढवा हे “तुंबानगरी” होत आहे. परंतु काही माजींना असे वाटतं की आमच्या शिवाय कोणीच नाही? म्हणून आदोंलने व विकास कामात अडथळा आणून भावींना दाबण्याचा व खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार चालू असल्याची चर्चा कोंढवा मध्ये रंगली आहे. भावींना, माजी का घाबरत आहे असा प्रश्न देखील स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.