पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील वाहतूकीचा कोंडमारा झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यात वाहतूक पोलीस फक्त पावत्या फाळण्यात श व्यस्त आहेत.पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची नुकतीच भेट घेतली होती.
शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी अधिक वाहूतक
पोलिसांची गरज आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी
मागणी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती.त्यावेळी तातडीने वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली होती.
यानंतर आता पोलीस आयुक्तांनी मोठे पाऊल उचलले आहे.पुणे शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती केली आहे.
पुण्यातील वाहतुकी संदर्भातील माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे हे भाग्यश्री नवटके यांना देतील. तसेच कामकाज आणि कर्तव्याबाबत अहवाल सादर करतील, असे पोलीस आयुक्त अमिताभ
गुप्ता यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. डीसीपी वाहतूक यांच्या मनमानी कारभाराला देखील चाप लावण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे.