कोंढव्यातील ट्राफिकने नागरिक बेहाल, तर ट्राफिक पोलिसांची बेफिकीर वृत्ती.!

0
Spread the love

स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आंदोलनाच्या तयारीत.

ट्राफिक पोलीस निरीक्षक सक्षम नसल्याचे नागरिकांचे मत.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) अजहर खान,

उपनगर भागातील कोंढवा मध्ये बघता बघता लोक संख्या झपाट्याने वाढली आहे. मोठ्या इमारती अनधिकृत पणे उभ्या राहिल्याने आज रहिवाशांना पार्किंगची व्यवस्था केली गेली नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करून निवांत बसून गप्पा मारणा-यांची संख्या काही कमी नाही.

त्यात ट्राफिक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आज कोंढव्यातील “वाहतूकीचा बकासुर” आवरायला कोणी तयार नाही? आज त्याला आवरलं नाही तर येत्या काही महिन्यात अवस्था आणखीनच बिकटच होणार यात शंकाच नाही. कोंढवा रहिवाशांसाठी ट्राफिक विभाग असले तरी ते असून नसून काही उपयोगाचे नसल्याचे काही सामाजिक संघटनांनी म्हटले आहे.

खरंतर ट्राफिक पोलिसांना वाहने अडवून पावत्या फाडण्यातच जास्त रस असल्याचे दिसून आले आहे. ट्राफिक पोलिस फक्त खडी मशिन चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच आहे का? आज पाहिलं गेले तर फकरी-हिल पासून ते एन.आय.बी.एम पर्यंत, त्या पासून पुढे आले की माजी आमदार महादेव बाबर यांच्या कार्यालयापर्यंत, मिठानगर, भाग्योदयनगरला जाणा-या रस्त्यावर, सत्यानंद हॉस्पिटल शेजारी जाणा-या रस्त्यावरून ते नवाजीश पार्क पर्यंत, मोर मॉल ते अशोका म्युझ सोसायटी पर्यंत, रोज वाहतूकीचा समाना कोंढवा रहिवाशांना करावा लागत आहे.

या रोजच्या कोंडीमुळे आता कोंढावाकरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रोजच्या “वाहतूकीचा बकासुर” पासून मुक्ती मिळवी करीता येत्या दोन-तीन दिवसांत कोंढवाकर रस्त्यावर उतरून कोंढवा ट्राफिक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निषेध देखील करणार आहे.

तर ट्राफिक पोलीस निरीक्षक समक्ष नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी देखील केली जाणार असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. वाहतूक कोंडी आमचा जीव गुदमरून जातोय लवकरात लवकर वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते छबिल पटेल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here