गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
पुण्यात चक्क घरातच गांजा विकणाऱ्या तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शहरातील भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड परिसरात मोठी कारवाई केली आहे.
२३ किलो गांजा, एक मोबाईल, रोख रक्कम आणि ४.५ लाखांचा वजन काटा जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून कॉलेज कॅम्पसमध्ये गांजा विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
अमित प्रभाकर कुमावत वय ३२, सनी विजय भोसले वय २४, साई गीता कोटाकोंडा वय १९ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ कायद्यान्वये २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपी मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.
ते एकमेकांशी परिचित आहेत. शहरातील सिंहगड रोड परिसरातील कात्रज येथील नामांकित कॉलेजच्या आवारात ते गांजा विकत होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या आवारात गस्त घालत असताना पोलीस हवालदार विशाल शिंदे यांना अमित राहत्या घरातून गांजा विकत असल्याची माहिती मिळाली.
४ लाख २३ हजार रुपये किमतीचा २१ किलो गांजा सापडला आहे. दुसरी कारवाई सिंहगड रोडवरील जाधव नगर भागात करण्यात आली आहे.
गस्ती पथकाने त्यांना पाहिले असता सनी आणि सई सिद्धेश्वर हॉटेल समोर रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरताना दिसले. त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.