सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी असताना दिलेल्या बिलांची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी; तामखेडे एसीबी अटक प्रकरण.

0
Spread the love

ज्युनियर इंजिनिअर मृत्यू , एका महिलेची चौकशी तर उप अभियंताचे निलंबन मग सचिन तामखेडेची चौकशी का झाली नाही?

सचिन तामखेडेंची मालमत्तेची चौकशी होणार का?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे महानगर पालिका कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांना काल ११ एप्रिल रोजी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( anti corruption buro) थेट अटक केल्याने महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर त्याचे पडसाद भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात पाह्यला मिळत आहे.

सचिन तामखेडे हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त असताना काही रस्त्यांची विकास कामे न होता थेट बिले दिली गेल्याची घटना घडली होती. तर जे बिले दिली गेली होती त्या फाईलीच गायब झाल्या होत्या. परंतु त्या फाईली मिळाल्या की नाही ते अजूनही गुलदस्त्यातच आहे.

परंतु त्या फाईलीचे वादंग महापालिकेच्या सभागृहात देखील पाह्यला मिळाले, त्या संदर्भात चौकशीचे आदेश निघाले, तर निलंबनाची कारवाई होणार हे ऐकूनच एका ज्युनिअर इंजिनिअरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. व एक महिला ज्युनिअर इंजिनिअरची चौकशी देखील सुरू होती,आणि उप अभियंताची चौकशी होऊन निलंबित देखील करण्यात आले,

परंतु भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी असताना सचिन तामखेडेंची साधी चौकशी देखील करण्यात आली नाही? बिलांवर सह्या करताना खरचं ती कामे झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करायची गरज का भासली नाही? ठेकेदाराकडून टक्केवारीत त्यांचा देखील वाटा होता का? मग वरिष्ठांनी अभय का दिला? अशी चर्चा लाचलुचपत विभागाच्या कारवाई नंतर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सध्या सुरू आहे.

“तामखेडे सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणीची चौकशी होणार का?”

सचिन तामखेडेंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने मनपात चर्चेला उधाण आले आहे.तर तामखेडे यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची चौकशी करण्याची चर्चा कोथरूड- बावधान क्षेत्रीय कार्यालयात रंगली आहे. अश्या कितीतरी ठेकेदाराकडून टक्केवारी- लाच मागितली आहे.व ज्या ठेकेदारांनी लाच दिली किंवा द्याला भाग पाडली त्याची देखील चौकशी होणार का?

“कोथरूड बावधान क्षेत्रीय कार्यालयातील तामखेडेंचया ऑफिसचा खर्च कोणी केला व का?”

कोथरूड बावधान क्षेत्रीय अधिकारी नियुक्ती झाल्यानंतर सचिन तामखेडे यांनी कोणत्याही प्रकारची शासकीय प्रक्रिया पार न पाडता त्यांच्या केबिनला लाखो रूपये खर्च केल्याची चर्चा सध्या क्षेत्रीय कार्यालयात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here