बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
खाजगी इसम विठ्ठल चव्हाण फरार.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील लिपीकास ५ हजारांची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
त्या संदर्भात एका वय – ३१ वर्षीय इसमाने तक्रार दाखल केली होती. उत्तम किसन धिंदळे, वय – ४५ वर्षे,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, पुणे.२) खाजगी इसम विठ्ठल चव्हाण अश्या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांनी परमीटरूमचे लायसन्स प्रक्रियेसाठी राज्य
उत्पादन शुल्क कार्यालयातून पोलीस कमिशनर ऑफीस व वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत त्या कार्यालयांना पाठविण्याचे पत्र देण्यासाठी लोकसेवक उत्तम धिंदळे यांना भेटले असता त्यांनी ५ हजार रूपयांची लाचेची मागणी केली,
तक्रारीची ११ एप्रिल रोजी पडताळणी केली असता तक्रारदार यांचेकडे
परमीटरूमचे लायसन्सकामी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून पोलीस कमिशनर ऑफीस व वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत
त्या कार्यालयांना पाठविण्याचे पत्र देण्यासाठी उत्तम धिंदळे यानी