पोलीसांना मारण्याचा अधिकार कोणी दिला, नागरिकांचा प्रश्न.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील मुंढवा येथील ” वॉटर” नावाच्या पब मध्ये रात्री सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून त्या कारवाई दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश पुराणीक यांनी तेथील तरूणांना व कामगारांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
थेट मारहाणीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली परंतु आतिल तरुण-तरूणींना व आतिल वेटरांना दांडक्याने मारहाण करून ग्लास व इतर सामानाची तोडफोड केल्याचा आरोप केला जात आहे.
कारवाई करायची सोडून मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी? असा प्रश्न देखील तरुणाईने विचारला आहे. विषेश म्हणजे ज्या पोलीस निरीक्षकाने मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
ते सारखंच वादग्रस्त ठरलेले आहेत. समर्थ वाहतूक शाखेत असताना त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुराणीक यांची उचलबांगडी झाली होती.
परंतु ते आता “वॉटर” नावाच्या पब मध्ये मारहाण केल्याचा आरोप झालयाने पुन्हा वादग्रस्त ठरले आहे. तर त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी तरण-तरुणींने केली आहे.