मस्जिद वरील भोंग्याचा आवाज जास्त आहे का वाहतूकीचा गोंगाट; पोलखोल.

0
Spread the love

भोंग्याला विरोध आहे का अजानला? महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत मस्जिद वरील भोंगे काढा अन्यथा आम्ही मस्जिद समोर हनुमान चालीसा पठण करू असे वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे.

तर त्यावर न थांबता उत्तर सभेत देखील राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत भोंगे काढण्याचे अल्टिमेटम दिले आहे. यावरून मुस्लिम समाजात ठाकरे विरोधात रोष पाहिला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी भोंग्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

यावर एका ऑनलाईन वृत्त वाहिनीने केलेल्या आवाज मर्यादा पाहणीत काही बाबी आढळून आल्या आहेत. वृत्तवाहिनीने केल्या पाहणीत मुंबई, पुणे, नागपूर शहरात अजानच्या आवाजा पुर्वी वाहनांचा गोंगाटाच ८०-८१ डिसेबल दिसून आला आहे. तर अजान सुरू झाल्यानंतर तोच आवाज क्वचित ८२-८३ डिसेबल म्हणजे २-३ च्या फरकाने दाखवला आहे.

दिवसा ५५ डिसेबलची व रात्री ४५ ची मर्यादा असताना वाहनांचाच आवाज जास्त असल्याचे दिसून आले आहे. मग मस्जिद वरील भोंग्याचा आवाज जास्त कसा? या बाबतीत प्रश्न निर्माण झाला आहे.

भोंग्याचा विषय फक्त नावालाच आहे का त्याच्या आड मध्ये मुस्लिम द्वेष पसरविण्याचे कारस्थान तर नाही ना? असा प्रश्न देखील महाराष्ट्रच्या जनतेला पडला आहे.

भोंगे काढण्याचे राजकारण करण्यापेक्षा वाहतूकाचा गोंगाट कमी करण्यासाठी राज ठाकरेंनी आवाज उचलावा असे महाराष्ट्रातील जनतेचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here