रूफटॉप ( टेरेस) हॉटेलांचा सुळसुळाट सध्या पुणे शहरात पाहायला मिळत आहे तर त्या बाबतीत “पुणे सिटी टाईम्सने” प्रथम बातमी प्रसिद्ध केली होती. त्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीरपणे रूफटॉप हॉटेल चालविल्या प्रकरणी ७ जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
परंतु गुन्हे दाखल होऊनही कारवाई न झाल्याने पुन्हा प्रश्न उपस्थित झाला होता.त्याची दखल घेऊन पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभाग झोन ४, कारवाई केली आहे.
१) द माफिया स्काय लाँज हाॕटेल २७०.०० चौरस मीटर,२)अॕटमाॕस्फिअर -६ हाॕटेल ५०.०० चौरस मी, ३) द अँबीयन्स हाॕटेल १५०.०० चौरस मीटर ४) हाॕटेल हिंदुस्तान इंटरनॅशनल ४००.००चौ. मीटर, अशी एकूण क्षेत्रफळ -१३२०.०० चौ.मी. लोखंडी /पत्राशेड /वीट बांधकाम १४२०९.०० चौ.फुट. कारवाई केली आहे.
सदरील कारवाई उप अभियंता एकनाथ गाडेकर,कनिष्ठ अभियंता फारूक पटेल,कश्यप वानखेडे,सहाय्यक पराग गो-हे,विनायकजाधव, स्नेहा इंगोले,मनपा कडील१० बिगारी, यांनी केली आहे. हॉटेलांना योग्य अग्निरोधक यंत्रणा नसल्याने शहरात काही ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत.
अशा हॉटेल्स आणि रुफ टॉप हॉटेलवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई ची मोहीम हाती घेतली आहे याची संबधीतानी नोंद घ्यावी व स्वतः असे अनधिकृत विकसन काढून घ्यावे असे आवाहन पुणे महानगर पालिकेने केले आहे.