पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
कोरेगांवपार्क परीसरात मोठ्या आवाजात सांउड सिस्टिम सुरू असलेबाबत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना माहिती मिळाली. कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळल्याने हॉटेलवर कारवाई करून १ लाख ८० हजार किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २००० ) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.तसेच यापुढेही अशा प्रकारच्या कारवाई करण्यात येणार आहेत.साऊंड सिस्टीम कोरेगांवपार्क पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त,संदिप कर्णिक,पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शना खाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच अश्विनी पाटील,पोलीस अंमलदार अजय राणे,मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण याआहे पथकाने यशस्वी केली आहे.